लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाशिक: जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मालेगाव तालुक्यातील आघार येथील प्रतिक्षा पवार यांना घरातच साप चावला. हा प्रकार इतरांच्या लक्षात येताच तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत सिन्नर येथील शशिकला आव्हाड (३६) या घराच्या पाठीमागे काम करत असतांना त्यांच्या उजव्या पायाला साप चावला. हा प्रकार त्यांच्या मुलाच्या लक्षात आला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.