धुळे – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरांना पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा लाख रुपये किंमतीच्या २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कामगिरीबद्दल धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पिंपळनेर पोलिसांचा प्रशस्तीपत्रक आणि १० हजार रुपये देऊन गौरव केला आहे.

नाशिक, मालेगाव, सटाणा या भागासह धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून दुचाकी चोरी करुन त्यांची विक्री करणाऱ्या एका चोराची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे हवालदार राकेश बोरसे यांना मिळाल्यावर त्यांनी सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना त्याबद्दल सांगितले. त्यानुसार पारधी यांनी चोराच्या तपासासाठी पथक तयार केले. पथकाने शामील बागूल (२१, रा.शेंदवड, ता.साक्री) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकी चोरीविषयी चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार रोशन गायकवाड (२३, रा. विरगाव, ता.बागलाण) याच्यासह नाशिक जिल्ह्यासह मालेगाव, साक्री तालुक्यातून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी गायकवाडलाही ताब्यात घेतले. या दोघांनी देशशिरवाडे, बोपखेल, मालेगाव कॅम्प, छावणी, वडनेर, खाकुर्डी, सटाणा या ठिकाणांहून २० दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी या दोघांकडून सहा लाख २५ हजार रुपयांच्या २० दुचाकी हस्तगत केल्याची माहिती अधीक्षक बारकुंड यांनी दिली. 

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान