नाशिक शहरातील गंगापूर रोडवर जेहान सर्कल परिसरात भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघाताने रस्त्यांमध्ये असलेल्या झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- जळगाव; मांडूळ सापाची तस्करी करणारे चार जण जाळ्यात

शनिवारी पहाटे काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असतांना आनंदवलीकडून जेहान सर्कलकडे येत असतांना भोसला सैनिकी शाळे समोरील रस्त्यावरील झाडावर दुचाकी आदळली. या अपघातात भरत रोकया- क्षत्रिय (१९), पंकज रावत (२६) आणि जतीन क्षत्रिय (१९) हे तिघे जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, भरत क्षत्रियचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उपचार सुरु असताना रावतचा मृत्यू झाला. क्षत्रिय आणि रावत हे मूळ नेपाळचे रहिवासी होते. ते गंगापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये काम करीत होते.

हेही वाचा- नाशिक : इगतपुरीत तलावात बुडून तिघांचा मृत्यू; नातेवाईकांचा ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या

गंगापूर रोडवर असलेल्या तीन वृक्षांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत. जेहान सर्कलजवळील भोसला सैनिकी विद्यालयासमोर, आनंदवलीकडे वळतांना आणि बारदान फाट्याच्या अलिकडे असे हे तीन वृक्ष आहेत. तीनही वृक्ष अवाढव्य स्वरूपात आहेत. पर्यावरण प्रेमींचा ही झाडे तोडण्यास विरोध आहे.