मंगळवारी शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांना मुसळगाव औद्योगिक वसाहतीजवळ खासगी बसने धडक दिल्याने दोन तरुण साईभक्तांचा म़त्यू झाला. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय शंभू जाधव (२३) व महेश शंकर सिंग (२३) रा. मीरा रोड रा. मुंबई असे मृत्यू झालेल्या साई भक्तांचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नाशिक नाशिक: एका विवाहाची चर्चा.. करोनातील विधवेला उच्चशिक्षित युवकाची साथ-

सध्या सिन्नर मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. साईभक्त हे कोंडी टाळण्यासाठी पायी चालतात. मात्र यामुळे साईभक्तांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मुंबई येथील साई संस्कृती फाऊंडेशन व राज प्रतिष्ठानच्यावतीने मुंबई ते शिर्डी असे पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी सहा वाजता मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सिन्नर- शिर्डी रस्त्यावरून साईभक्त हे शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ होत असतांना बी. एस. एल. कंपनीसमोर पाठीमागून आलेल्या खासगी बसची त्यांना धडक बसली. या घडकेत संजय आणि महेश दोघे गंभीर जखमी झाले. सोबतच्या मित्रांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला. सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची माहिती देण्यात आली.