इयत्ता १० वी परीक्षेसाठी दुचाकीने निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला. सिन्नर-घोटी मार्गावरील आगासखिंड शिवारात गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. शुभम रामनाथ बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे (१६) असे दोन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत.

हेही वाचा- दोन बोग्यांखालून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीती; नांदेड-कुर्ला एक्स्प्रेसमधील प्रकार

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील शुभम आणि दर्शन दोघे इयत्ता १० वीचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. सिन्नर- घोटी महामार्गावरील आगासखिंड शिवारात सकाळी १० वाजता ते पोहचले असता शिक्षण शास्त्र महाविद्यालयापुढे दुचाकी पुढे असलेल्या टँकरवर आदळली. या अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सिन्नर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली.

Story img Loader