लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार : घोडे व्यापारासाठी देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा घोडे बाजाराला सुरुवात झाली असून दोन हजारांहून अधिक खरेदीदार दाखल झाले आहेत. सारंगखेडा घोडे बाजारानिमित्त आयोजित चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांच्या विविध स्पर्धा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत.

Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Chitra Wagh accuses MVA of making a deal with Maharashtra
मविआवर महाराष्ट्राचा सौदा केल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

सारंगखेडा घोडे बाजाराला साडेतीनशे वर्षापेक्षा अधिकची परंपरा आहे. मागील काही वर्षांपासून आयोजकांनी या घोडे बाजाराला चेतक फेस्टिव्हलचे स्वरुप देत आधुनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा बाजार सुरु होण्याआधीच खरेदी- विक्रीसाठी दोन हजारांहून अधिक घोडे दाखल झाल्याने घोड्यांच्या तंबूना जागाही उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश , पंजाब, हरियाणा, गुजरात आणि यंदा प्रथमच दक्षिण भारतातूनही घोडे तबेलेमालक खरेदी-विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

आणखी वाचा-नाशिकरोड ट्रॅक्शन यंत्र कार्यशाळेच्या कार्याचा सन्मान, सर्वोत्कृष्ट नवउपक्रमासाठीचे पहिले पारितोषिक

यंदा चेतक फेस्टिव्हलमध्ये साहसी क्रीडा स्पर्धांसह शर्यत, अश्वसौंदर्य आणि अश्वनृत्य या स्पर्धा आकर्षणाचे केंद्रबिंदु राहणार आहेत. अशा स्पर्धांसाठी घोड्यांना तयार करण्याची विशेष लगबग सध्या मालकांमध्ये दिसत आहे. देशविदेशातील बाजारपेठा गाजवलेली मोरणी घोडी, मॅडोना घोडी, गोल्डन रॉक, सप्तांश, गाजीम, कसेरी, लालरतन असे किंमती घोडेही बाजारात येणार आहेत. यंदा पंधरा दिवस चालणाऱ्या या घोडे बाजारात पर्यटक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.