लोकसत्ता वार्ताहर
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील फळ व्यापाऱ्याची सव्वाबारा लाख रुपयाला फसवणूक केल्याप्रकरणी गुजरात राज्यातील दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेटावद येथील रहिम खान रशिद खान पठाण हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांना गुजरातमधील असलम याकूब पाडा आणि हफनान असलम पाडा (दोन्ही रा.जुहूरपुरा फ्रुट मार्केट, ग्रोधा, गुजरात) यांनी फळ व्यापारी पठाण यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. फळ खरेदी करायचे सांगून गोध्राचे दोघे व्यापारी मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यात बेटावद येथे आले. फळ विक्रीसाठी पाठवून द्या, तिकडे गेलो की पैसे पाठवतो, असे दोघांनी पठाण यांना सांगितले.
हेही वाचा…. परिवहन विभागाकडून वर्षभरात सात कोटींपेक्षा अधिक दंड वसूल
हेही वाचा…. जळगाव : पाचोरा बाजार समितीत स्वबळावर लढण्याचा भाजपाचा निर्णय
त्यावर विश्वास ठेवून पठाण यांनी वेळोवेळी १२ लाख, २५ हजार ११४ रुपयांची फळे गुजरातला पाठविली. परंतु, त्यानंतर दोघा व्यापाऱ्यांनी पठाण यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर वर्षभरानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फळ विक्रेते रहिम पठाण यांनी असलम पाडा, हफनान पाडा यांच्याविरुद नरडाणा पोलिसांत गुन्हा दाखल केला.