बांधकाम मजुरांच्या गाडीला अपघात होवून दोन महिलांचा मृत्यू झाला. ११ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशीरा खोकसा घाटात घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून वाहनाखाली मजूर दाबले गेले. पोलीस आणि स्थानिकांनीे बचाव कार्य राबवुन जखमींना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>धुळे: लाचप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांसह तीन जणांविरुध्द गुन्हा

नंदुरबार तालुक्यालील नवागाव (खांडेपाडा) आणि नवापूर तालुक्यातील बिजादेवी गावातील बांधकाम मजूर हे साक्री तालुक्यातील उमरपाटा परिसरात स्लॅब भरण्यासाठी गेले होते. या मजुरांच्या वाहनाला मागील बाजूस यंत्र व लोट गाडी जोडून खोकसा घाटातून उतरून येत होते. अचानक वाहनावरचे नियंत्रण सुटल्यान गाडी घाटातील लगतच्य खड्यात उलटी झाली. वाहनात बसलेले जवळपास १६ जण वाहनाखाली दाबले गेले.घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने वाहनाखाली दाबले गेलेल्या मजुरांना बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two women died in an accident involving a construction worker car amy