मालेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख रामा मिस्तरी यांनी पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मालेगावात धक्का बसला आहे. अविभाजित शिवसेनेत मिस्तरी यांनी अनेक वर्षे मालेगाव महानगरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शिवसेनेतील फुटीनंतर मालेगावातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मिस्तरी हे मात्र ठाकरे गटातच राहिले. ठाकरे गटाने त्यांना तालुकाप्रमुख केले.

हेही वाचा >>> Malegaon Central : मुस्लीम समाजाचं वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आहे?

pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
bjp want ajit pawar to contest elections separately jayant patil claim
‘अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला’; जयंत पाटील यांचा दावा
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
married woman Suicide due to abuse and harassment
अत्याचार, छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Justice Abhay Oak critical comment that only the court has the power to punish the accused
आरोपीला शिक्षा देण्याचा अधिकार केवळ न्यायालयाचा; न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड भाष्य
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
thane education officer challenges suspension over badladpur sex assault in bombay hc
Badlapur Sexual Assault: निलंबनाच्या कारवाईविरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात

अलीकडेच, ठाकरे गटाने अचानक मिस्तरी यांचेकडील पद काढून जितेंद्र देसले यांना दिले. यामुळे मिस्तरी आणि समर्थकांमधील नाराजी उफाळून आली आहे. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेऊन मिस्तरी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता आपले पद काढून घेण्यात आले असून त्यास हिरे हे जबाबदार असल्याचा आरोप मिस्तरी यांनी केला. काही दिवस पक्षापासून अलिप्त राहिलेले बंडू बच्छाव यांना गेल्या महिन्यात आपण संजय राऊत यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतर बच्छाव सक्रिय झाल्याने मालेगाव बाह्य मतदार संघात उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार झाले. त्याचा हिरे यांना राग आला असावा आणि त्यातून त्यांनी आपल्याला पदावरुन काढण्यासाठी षडयंत्र रचले, असेही मिस्तरी यांनी म्हटले आहे. मिस्तरी हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.