अलीकडे राजकीय व्यक्तींकडून अत्यंत खालच्या स्तरावरील भाषेचा वापर केला जात असून अश्लाघ्य भाषेचा वापर वाढीस लागल्याबद्दल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी चिंता व्यक्त केली आहे. नवीन पिढीवर याचे चुकीचे परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> धुळ्याहून लवकरच मनमाडमार्गे दादर रेल्वेगाडी -प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस सेवा

येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. निकम यांनी मार्गदर्शन केले. ज्या व्यक्तींची नाळ मातीशी घट्ट जुळलेली असते, त्यांची भाषा कधीच घसरत नाही. समाज माध्यमांसह वेब मालिकांवर सेन्सॉरशिप नसल्याने त्यावर अत्यंत हीन भाषेचाही वापर केला जातो. त्यांच्यावरील भाषेचा स्तर अत्यंत खालचा असतो, असे ॲड. निकम यांनी नमूद केले. यावेळी संगीतकार कौशल इनामदार, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, डॉ. राजेश पाटील, प्रवीण जोशी, बाळासाहेब मगर, स्वाती भामरे, शिवाजी दहिते, विजयकुमार मिठे, डॉ. सुभाष भालेराव, सुवर्णा जगताप यांना गिरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा >>> सप्तश्रृंग गड शिखरावर कीर्तिध्वज फडकला; भाविक परतण्यास सुरुवात

व्यासपीठावर योगेश चिकटगावकर, डॉ. रवींद्र कोल्हे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, वसई-विरार मनपाचे आयुक्त अनिल पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित होते. मुक्काम पोस्ट गिरणा गौरव या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक अश्विनी बोरस्ते यांनी केले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujjwal nikam expressed concern over increasing use of vulgar language by political persons zws