नाशिक जिल्ह्यात निफाड येथे चांदोरी शिवारात एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. निफाड तालुक्यातील खेरवाडी-चांदोरी रस्त्यावर सुसाट कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट किराणा दुकानात घुसली. त्यामुळे किरणा दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे ही भरधाव कार किराणा दुकानात घुसली तेव्हा दुकानात एक ग्राहक आणि दुकानदार हजर होते. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यासंदर्भात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं?

चांदोरी शिवारात खेरवादी-चांदोरी रस्त्यावर एक भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका किराणा दुकानात घुसली. यावेळी किराणा दुकानात एक ग्राहक काही वस्तू खरेदी करण्यासाठी आला होता. तसेच दुकानदार ग्राहकाला वस्तू देत असतानाच सुसाट कार दुकानाच्या दिशेने येत असल्याचं दिसलं. यानंतर संबंधित ग्राहक जीव वाचवण्यासाठी घाईने दुकानापासून दूर पळाला.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, कारचा चुराडा; पाच जणांचा जागीच मृत्यू

विशेष म्हणजे भरधाव कार दुकानाकडे येत असताना दुकानदार दुकानातच होता. त्यावेळी दुकानदाराने देखील तातडीने प्रसंगावधान बाळगत दुकानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी कार थेट दुकानात घुसली. त्यामुळे दुकानातील काऊंटरला धडक बसून दुकानाचं मोठं नुकसान झालं. तसेच दुकानदार थोडक्यात बचावले.