सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत प्रवेश प्रक्रियापात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून १७ मार्चपर्यंत आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक पालकांना अर्ज सादर करता येणार आहेत. पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
हेही वाचा- नाशिक : भाव नसल्याने पाच एकर कोबी पिकावर नांगर
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खासगी विनाअनुदानित व खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत पालकांना अर्ज भरता येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग, अपंग बालके, एचआयव्ही बाधित बालके, अनाथ बालके तसेच करोनामुळे ज्यांनी पालक गमावले अशा बालकांसाठी अर्ज करता येणार आहे. पालकांनी या अंतर्गत १० शाळांची निवड करावी, अर्ज भरतांना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल नकाश्यावरून निश्चित करण्यात यावे, चुकीची माहिती भरली असल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
हेही वाचा- दोन बोग्यांखालून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीती; नांदेड-कुर्ला एक्स्प्रेसमधील प्रकार
पालकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना लघु संदेशाद्वारे पुढील माहिती दिली जाईल. आभासी पध्दतीने सोडत जाहीर होईल. पहिल्या तीन याद्या जाहीर होतील. प्रवेशावेळी पालकांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती तपासेल.
हेही वाचा- जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ; परिचारिकेला मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन
कोणती कागदपत्रे सादर करावी ?
निवासी पुरावा म्हणून स्वत:च्या मालकीची निवासी व्यवस्था असल्याचा पुरावा, वाहन परवाना, वीज देयक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे ओळखपत्र, जन्मतारखेचा पुरावा, सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे-बालकांचे जातीचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, अपंग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा, करोना बाधित बालकाच्या पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र