‘वॉक विथ कमिशनर’ला शह देणारा ‘महापौर आपल्या दारी’ राबविताना अधिकाऱ्यांची दमछाक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात चाललेल्या उपक्रमांच्या शीतयुद्धात प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ला शह देण्यासाठी भाजपने ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमाची गाजावाजा करीत सुरुवात केली. एक उपक्रम भ्रमंती करून तर दुसरा जागेवर कित्येक तास उभे राहून नागरिकांशी संवाद साधणारा आहे. त्यात सहभागी होताना वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुखांची दमछाक होत आहे.
गेल्या आठवडय़ात नाशिकरोड विभागातून महापौर आपल्या दारी उपक्रमास सुरुवात झाल्यानंतर दुसरा पाहणी दौरा सातपूर विभागात पार पडला. प्रभाग क्रमांक १० आणि ११ मधील पाहणी दौऱ्यात महापौरांसोबत स्थायी सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थानिक नगरसेवक सहभागी झाले. यावेळी रस्ते रुंदीकरण, रस्त्यांच्या कडेची बाजू वर-खाली असणे, विकास आराखडय़ातील रस्ते विकसित करणे, अस्वच्छता, बंद पथदीप, नवीन जलकुंभ कार्यान्वित करणे, क्रीडांगण, मंडई, खोका संकुल आदीं सुविधा आणि तक्रारींकडे लक्ष वेधण्यात आले.
अशोकनगर पोलीस चौकी येथून पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली. परिसरातील उद्यानात मोठया प्रमाणात कचरा दिसून आला. त्याची स्वच्छता करण्याचे निर्देश भानसी यांनी दिले. काही भागात सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही. नवीन जलकुंभावरून सक्षमपणे पाणी पुरवठा होत नाही. चामुंडानगर परिसरात साफसफाईची मागणी करण्यात आली. पालिकेच्या शाळा क्रमांक २४ आणि बी. डी. भालेकर इंग्रजी शाळेला भेट देण्यात आली. शिक्षकांचे मानधन मिळत नसल्याची तसेच विभासनगरमध्ये पाणीटंचाईचा प्रश्नाची तक्रार सदस्यांनी केली.
सातपूर कॉलनीतील पाहणीत खोका संकुलाचे प्रश्न समजून घेण्यात आले.
उद्यानातील खेळणी, प्रवेशद्वार दुरुस्ती, शाळा क्रमांक २८ ची स्वच्छता कायम राखण्याचे सूचित करण्यात आले. रस्ते आणि इतर महत्वाच्या कामांचे प्राकलने करणे, डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही याची सर्वानी काळजी घेणे, या सुचविलेल्या कामांबाबत सात दिवसांत कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तीन तासात महापौरांनी प्रभागातील अनेक भागांना कधी पायी, तर कधी मोटारीतून भ्रमंती करत भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशेर बोर्डे, विभागीय अधिकारी, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक आठवडय़ात महापौर आणि आयुक्तांचा उपक्रम स्वतंत्रपणे होणार आहे. आयुक्तांच्या उपक्रमास भल्या सकाळी म्हणजे सहा वाजेपासून धावपळ करावी लागते. त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना झाडून हजर रहावे लागते. प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि उपस्थित राहणारे नागरीक यांच्यावर तो उपक्रम कितीवेळ चालेल हे अवलंबून असते. त्यात किमान दोन-तीन तास सक्तीने उभे राहावे लागते. उपक्रमांच्या धडाक्याने अधिकारी वर्ग बेजार झाला आहे.
समर्थ जॉगिंग ट्रॅकवर ‘वॉक विथ कमिशनर’
महापालिकेच्यावतीने शनिवारी सकाळी साडेसहा वाजता गंगापूर रस्त्यावरील समर्थ जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत आयुक्त तुकाराम मुंढे हे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पालिकेशी निगडित समस्या, अडचणी, शहर विकासाच्यादृष्टीने संकल्पना, प्रस्ताव जाणून घेतल्या जातील. नागरिकांनी साध्या कागदावर आपल्या तक्रारी, सूचना उपक्रमस्थळी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात. टोकन क्रमांकानुसार नागरिकांना आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करता येणार आहे.