जळगाव : शेळीपालनासाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील अनुदानाची रक्कम देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच स्वीकारताना शहरातील वसंतराव नाईक भटके-विमुक्त जाती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह कंत्राटी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकले. भीमराव नाईक (५५) असे जिल्हा व्यवस्थापकाचे, तर आनंद कडेवाल (३४) असे कंत्राटी कर्मचार्‍याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नाशिक : ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करताना महिलेचा मृत्यू

भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या बांधवांना सरकारी योजनेतून कर्ज मिळते. यावल तालुक्यातील बोरावल येथील ४२ वर्षीय तक्रारदाराने जळगावातील वसंतराव नाईक भटके-विमुक्त जाती महामंडळाच्या कार्यालयाकडे शेळीपालनासाठी एक लाख रुपयांचे कर्जाचे प्रकरण सादर केले. त्यापैकी पहिला हप्ता ७५ हजारांचा मंजूर होऊन प्राप्तही झाला. उर्वरित २५ हजारांचा हप्ता मंजूर करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक भीमराव नाईक यांनी स्वतःसाठी तीन हजार व कंत्राटी सेवक आनंद कडेवाल यांच्यासाठी दोन हजारांची लाच मागितली. त्यासंदर्भातील तक्रार जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasantrao naik mahamandal jalgaon district manager arrested for taking bribe of 3000 rupees css
Show comments