लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : देवळाली गावात जुन्या वादाची कुरापत काढून सोमवारी रात्री रिक्षा, दुचाकींसह चारचाकी वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या प्रकरणी दोन अल्पवयीनांसह पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
नाशिक शहरात घरफोडीचे सत्र, ३० लाखहून अधिकचा ऐवज लंपास
Road tax collection, heavy vehicles, Mumbai,
मुंबईच्या वेशीवर जड-अवजड वाहनांकडून २०२७ नंतरही पथकर वसुली?
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
nashik road jail
नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
Nashik Municipal Commissioner Manisha Khatri directed pwd to fix potholes immediately
नाशिक खड्डेमुक्त करण्याची सूचना; मनपा आयुक्तांनी खडसावले

सोमवारी मध्यरात्री देवळाली गावातील आबा पवार या व्यावसायिकाच्या घरावर हल्ला करून शिवीगाळ करण्यात आली. पवार घरात नसल्याने घरातील सामानाची तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांकडे कोयता, तलवार, गज अशी हत्यारे होती. त्यांनी वाहनतळ परिसरात येत जगदिश वाघेला यांचे मालवाहतूक वाहन, किशोर सिसोदे यांची कार, या दोन गाड्यांच्या काचा फोडल्या. घराजवळ असलेल्या चार दुचाकींसह चारचाकी, रिक्षांचे नुकसान करण्यात आले.

आणखी वाचा-जळगाव महापालिकेचा थकबाकीदारांना दणका, मालमत्ता जप्तीची मोहीम; दोन पथके नियुक्त

या प्रकारानंतर पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी उपनगर पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी सूचना दिल्या. उपनगर पोलिसांनी अजिम शेख, फरहान खान आणि साहिर नायर या तीन मुख्य संशयितासह दोन अल्पवयीन मुलांना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. उपनगर पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी परिसर भयमुक्त करावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

Story img Loader