नाशिक : नागपूर येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या डॉ. सी. डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कारासाठी यंदा येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण १५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहात (वनामती) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या पुरस्काराची घोषणा कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांनी केली. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषी अभ्यासक व शेतकरी नेते विजय जावंधिया असतील. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख उपस्थित राहणार आहेत. डॉ. मायी हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. देशातील नामवंत कृषी शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे. कापूस संशोधन क्षेत्रात त्यांनी फार मोठी भूमिका बजावली. कृषी क्षेत्रासाठीच्या नवनव्या तंत्रज्ञानाचे ते कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून कृषी विकास प्रतिष्ठानने त्यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केला आहे.

हेही वाचा >>> धुळ्यात काँग्रेसचे केंद्र, राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन

या पुरस्कारासाठी निवड झालेले विलास शिंदे हे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीधर असून २८ वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या संपूर्ण मालकीची असलेली देशातील आघाडीची व सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा लौकिक आहे. २०१० मध्ये शिंदे यांच्या पुढाकाराने ही कंपनी सुरू करण्यात आली. १६० शेतकऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता २० हजारांहून अधिक शेतकरी सभासद आणि सुमारे ३५ हजार एकर क्षेत्रावर पोहोचला आहे. २५२ हून अधिक गावांमध्ये सह्याद्री फार्म्सचे कार्यक्षेत्र आहे.