धुळे – महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांसाठी आकारण्यात आलेल्या करवाढीला तीव्र विरोध करत ग्रामस्थांनी शुक्रवारी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.
हेही वाचा – धुळे मनपा दवाखान्यांना कुलूप पाहून महापौर संतप्त; कारवाईचा इशारा
महापालिकेच्या सभागृहात हद्दवाढ झालेल्या ११ गावांतील नागरिकांची खा. डॉ. सुभाष भामरे आणि आयुक्त देवीदास टेकाळे, मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी पल्लवी शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे हेही उपस्थित होते. कुठल्याही मूलभूत सुविधा नसतांना आम्ही कर रुपात आकारण्यात आलेली रक्कम का भरायची, असा प्रश्न हद्दवाढीत समाविष्ट ११ गावांतील नागरिकांनी केला. २६ फेब्रुवारीपर्यंत अपेक्षित तोडगा न निघाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक संजय पाटील यांनी यावेळी दिला.