नाशिक : अनेक जण हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती असल्याने त्यांच्या सभेला गर्दी होत आहे, असे मत अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मत देण्याची वेळ येते तेव्हा, मतदार सहानुभूती विसरतो. देशाचे नेतृत्व कोण करू शकेल, अशा व्यक्तीला मतदान केले जाते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

येथे पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यासंदर्भात झालेल्या घटनेचा निषेध केला. एखाद्या उमेदवाराकडून अशी कृती होणार नाही. परंतु, उत्साही कार्यकर्त्यांकडून असा प्रकार होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये कोणाला घाबरुन नव्हे तर, आपल्यामुळे महायुतीचा उमेदवार ठरवण्यात अडचण येऊ नये, यासाठी माघार घेतली. स्पर्धेतून बाजूला झाल्यामुळे उमेदवाराची घोषणा लवकर होईल, असे वाटले होते. किमान २० मेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करावा, असा खोचक टोला भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना हाणला.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Sharad Pawar Ajit Pawar fb
“बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

हेही वाचा…लेव्हीविषयी तोडगा न निघाल्यास मतदानावर बहिष्कार, माथाडी कामगारांचा इशारा

कुठल्याही समाजाचा, पक्षाचा उमेदवार असला तरी त्याला किती मते द्यायची हे लोक ठरवतील. अनेक ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत. माझ्या उमेदवारी माघारीवरून काहींच्या मनात राग असला तरी, महायुती अडचणीत येईल अशी कृती करू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. नाशिकमध्ये जो उमेदवार दिला जाईल, त्याला विजयी करु, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे यांना आपण काय बोलतो ते कळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.