जळगाव : चोपडा येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा सुमारे चारशे वर्षांची विशाल परंपरा असलेला रथोत्सव गुरुवारी (6 आक्टोबर) साजरा होत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी यांनी दिली. श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव 6 व 7 ऑक्टोबर रोजी होत आहे. गुरुवारी (6 ऑक्टोबर) सकाळी दहाला गोलमंदिराजवळील श्री बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ झाला.

आशा टॅाकीज, ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, रथमार्गाने रथ आठवडे बाजार, पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल. तेथे रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी राहील. शुक्रवारी (7 ऑक्टोबर) रथाच्या परतीच्या प्रवासाला सकाळी दहाला प्रारंभ होईल. बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोल मंदिराजवळ येऊन यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल. यानिमित्ताने रथोत्सव काळात शहरात दोन दिवसांची रथयात्राही भरत असते.

Story img Loader