धरणातून पाणी सोडल्याने पक्ष्यांचे स्थलांतर; महिनाभरात पक्ष्यांच्या संख्येत घट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात सध्या विविध प्रजातींचे एकूण १७ हजार ८०० पक्षी असल्याचे प्रगणनेत उघड झाले आहे. महिन्यापूर्वी पक्ष्यांची संख्या यापेक्षा अधिक होती. प्रथम जायकवाडी आणि नंतर सिंचनासाठी धरणातून पाणी सोडल्यामुळे जलपातळीत वाढ झाली, त्यामुळे काही पक्षी स्थलांतरित झाले. पाणी बंद झाल्यावर स्थलांतरित झालेले रोहितसह अन्य पक्षी पंधरवडय़ात परततील, अशी वन विभागाला आशा आहे.
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षीमित्र, वन अधिकारी, कर्मचारी, स्थानिक मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत खानगाव थडी, मांजरगाव, चापडगाव, काथरगाव, कुरुडगाव, कोठुरे या गावांच्या हद्दीत पक्षी प्रगणना करण्यात आली. त्यात रोहित, क्रौंच, थापटय़ा, कापशी बदक, ठिपकेवाला गरुड, चोचीचा करकोचा, भुवई बदक, छोटा आर्ली, टिबुकली, नकटा बदक असे विविध प्रजातींचे एकूण १६ हजार ३९९ पक्षी तसेच परिसरातील झाडांवर, गवताळ क्षेत्रात १४०१ असे एकूण १७ हजार ८०० पक्षी आढळून आले. नोव्हेंबर महिन्यात जायकवाडी आणि नंतर सिंचनासाठी धरणांमधून पाणी सोडले गेले. बंधाऱ्यात पाणी पातळी वाढल्याने काही प्रमाणात पक्षी स्थलांतरित झाले. पक्षी प्रगणना यशस्वी करण्यासाठी साहाय्यक वनसंरक्षक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वन परिमंडळ अधिकारी अशोक काळे, वनरक्षक चंद्रमणी तांबे आदींनी प्रयत्न केले. त्यात अश्विनी पाटील, पक्षीमित्र दत्ता उगावकर, डॉ. उत्तम डेर्ले, आनंद बोरा, संतोष देशमुख आदींनी सहकार्य केले.
गतवर्षीइतकेच शुल्क; पर्यटकांना दिलासा
परदेशातून दाखल झालेल्या विविध पक्ष्यांनी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य बहरले आहे. त्यांचे मनोहारी दर्शन महाग होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन वन विभागाने यंदा शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. गतवर्षीइतकेच यंदा शुल्क राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
मागील काही वर्षांत पक्षी अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणास्तव शुल्क द्यावे लागत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. कुटुंबीयांसह पक्षीदर्शनासाठी जाणाऱ्यांना पुरेशा सुविधा नसताना मोठा भरुदड सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या. यामुळे यंदा शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचे निश्चित करण्यात आले.
अधिकाधिक पर्यटकांनी नांदूरमध्यमेश्वरला भेट द्यावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गतवर्षी याच ठिकाणी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मोठय़ा संख्येने पर्यटकांसह पक्षीप्रेमींनी भेट दिली होती. गतवर्षी या अभयारण्यातून विविध शुल्कांपोटी १३ लाखांचे उत्पन्न संयुक्त वन व्यवस्थापन समितीला मिळाले होते. दरवर्षी किमान सहा ते आठ हजार पर्यटक अभयारण्यात भेट देतात. परिसरात पक्षी निरीक्षणासाठी पाच मनोरे उभारण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर पर्यटकांना दुर्बिणींची उपलब्धता करून पक्षी न्याहाळण्याची सुविधा, वास्तव्य करू इच्छिणाऱ्यांसाठी विश्रामगृह, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक मार्गदर्शकामार्फत पर्यटकांना पक्ष्यांची ओळख करून दिली जाते. स्थानिक पातळीवर विविध सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जात आहे.
दर आकारणी
पर्यटकास प्रत्येकी ३० रुपये शुल्क राहील. विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत आहे. त्यांच्याकडून १५ रुपये आकारले जातात. परदेशी पर्यटकांना ६० रुपये शुल्क आहे. पाच वर्षांखालील मुलांना शुल्क नाही. वाहनतळासाठी चारचाकी मोटारीला ५० रुपये, तर बस, मालमोटारीला १०० रुपये आकारले जातात. दुचाकी वाहनांसाठी २० रुपये शुल्क आहे. व्यावसायिक कॅमेरे वापरावयाचे असल्यास १०० रुपये शुल्क आकारले जाते. या वर्षी शुल्कात कोणतीही वाढ केली गेलेली नाही.