पर्यावरण सेवा योजना विभागाचा पुढाकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दैनंदिन वापराच्या वस्तूंमधून निर्माण होणारा कचरा आणि त्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी विद्यार्थी दशेतच संस्कार व्हावेत, यासाठी पर्यावरण सेवा योजना विभागाने पुढाकार घेतला आहे. देवळा तालुक्यातील वाजगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात तयार होणाऱ्या कचऱ्यातून ‘जीवामृत’ तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले असून आता गावातील शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांकडून ‘जीवामृत’ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण किंवा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही. यासाठी लागणारी साधनसामग्री, मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद अनेक नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. त्यात घन कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याची विल्हेवाट ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पेटीत किंवा उकिरडय़ावर कचरा पडून राहणे, कुजून दरुगधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे, परिणामी परिसर अस्वच्छ दिसणे या त्रासाला सामोरे जावे लागते. दुसरीकडे कचरा शहर किंवा गावाबाहेर उघडय़ावर टाकून दिल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होते. घन कचरा वाहून जात नाही, तो उचलून न्यावा लागतो. यामुळे प्रदूषण त्या जागेपुरते मर्यादित राहत असले तरी न वापरातील जागा ही कचऱ्याने व्यापली जाते.

या पाश्र्वभूमीवर वाजगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण सेवा योजना विभागाच्या मदतीने कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घेतला. संस्थेचे सरचिटणीस प्रयाग सूर्यवंशी, योजना प्रमुख पी. बी. विशी, व्ही. एम. देवरे, पी. डी. क्षीरसागर, मुख्याध्यापक फंगाळ, प्रकल्प समन्वयक नाशिक विभाग जगदीश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गावातील उकिरडय़ाचे विघटन व्हावे तसेच जैविक खत मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी ‘जीवामृत’ तयार केले. हे जीवामृत उकिरडय़ावर टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे उकिरडय़ातील शेण, पालापाचोळा, गवत, चारा जलद गतीने कुजत असून त्याचा वापर पिकांसाठी खत म्हणून करण्यात येणार आहे. यामुळे जमिनीतील पोषणाचे प्रमाण वाढते. जमिनीची गुणवत्ता सुधारते. पाणी धारणक्षमता वाढते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दुसरीकडे, कचऱ्याची विल्हेवाट आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग माध्यमिक आश्रमशाळेने केला. शाळा परिसरातील झाडांना उन्हाळ्याच्या काळात पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या प्लास्टिक  बाटलीचा वापर करून ठिबक सिंचन तयार केले आहे. त्यासाठी बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडून त्यामध्ये सुतळी टाकून ही बाटली झाडाच्या बुंध्याला तीन ते चार दिवस ओलावा टिकून ठेवेल अशी व्यवस्था करण्यात आली. आवारातील ५६ झाडांना अशा ठिबकसिंचनाने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. वेगवेगळ्या प्लास्टिक पेल्यांपासून शोभेच्या वस्तू,  तुटलेल्या बांगडय़ांपासून तोरण, जुन्या कापडापासून पायपुसणी, छोटय़ा मोटारपासून मिक्सर, कागदी पत्रावळ्या, झुंबर, पानापासून पत्रावळ्या अशा वस्तू तयार करत त्याचे प्रदर्शन शाळेच्या आवारात भरविण्यात आले. या प्रदर्शनाला ग्रामस्थांनी भेट देत या संपूर्ण कामकाजाची माहिती घेतली.