महावितरणकडून ठिकठिकाणी होणाऱ्या दुरुस्तीच्या कामांमुळे २४ नोव्हेंबर रोजी शहरात दुपार व सायंकाळचा तसेच दुसऱ्या दिवशी सकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गंगापूर धरणाच्या पंपिंग स्टेशनात नवीन ऊर्जा मीटर बसविणे, उपकेंद्रविषयक कामे करणे यासह शहरातील पाणीपुरवठा वितरण वाहिन्यांची दुरुस्ती, गळती बंद करणे, आदी कामांसाठी मंगळवारी महावितरणकडून सकाळी १० ते रात्री १०पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पंपिंग स्टेशनमधून पाण्याचे पंपिंग होणार नाही. या कारणास्तव मंगळवारी दुपार व सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय दुसऱ्या दिवशीही सकाळचा पाणीपुरवठा होणार नसून, दुपार व सायंकाळी कमी दाबाने व कमी स्वरूपात पाणीपुरवठा होऊ शकेल, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा