लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या आदेशाची अंमबजावणी करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन २४ तासात पाणी सोडणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि बेकायदेशीर पाणी उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना प्रशासनाने पाटबंधारे विभाग व पोलीस यंत्रणेला केली आहे.

दुष्काळी वर्षात पाण्यावरून नाशिक, नगर आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा संघर्ष झाला. समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट, मुळा समुहातून २१००, प्रवरा समुहातन ३३६० असे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे आदेश दिले असले तरी सुमारे चार आठवडे त्याची अमलबजावणी झाली नाही.

आणखी वाचा-नाशिक : शहर पोलीस आयुक्तपदी संदिप कर्णिक

या संदर्भात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महामंडळाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. पाणी सोडले जात नसल्याने मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी गंगापूर धरणावर धडक देत आंदोलन केले होते. पाणी सोडण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी सायंकाळी तातडीने बैठक घेतली. दारणा धरणातून २४ तासात पाणी सोडण्यात येईल. गंगापूरमधील पाणी सोडण्यास काही अवधी लागणार आहे.

पाण्याच्या विसर्ग मार्गात पाणी चोरी होऊ नये म्हणून दारणा व गोदावरी काठावरील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. आंदोलन वा अन्य कारणास्तव विसर्गात अडथळे येऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा खबरदारी घेणार आहे.