लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शहरात शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पुन्हा पाणीबाणीची स्थिती राहणार आहे. या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे जळगावकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले

शहरात वीज कंपनीच्या उपकेंद्रात देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी दहावाजेपासून चारपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. वीज नसल्याने शहरात पाणी पुरवठा करता येणार नाही. शहराचा पाणीपुरवठा नियोजित वेळापत्रकानुसार एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

आता असा होईल पाणीपुरवठा

रविवार – खंडेरावनगर जलकुंभ- पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर. पिंप्राळा व मानराज पार्क जलकुंभ- शिंदेनगर, अष्टभुजा कॉलनी, वाटिकाश्रम परिसरातील उर्वरित भाग. खोटेनगर जलकुंभ- निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग. नित्यानंदनगर जलकुंभ- नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग, तांबापुरा, श्यामाफायरसमोरील परिसर. डीएसपी परिसर जलकुंभ- जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी, आनंदनगर, मोहननगर, तिवारीनगर, बाहेती शाळा. गिरणा जलकुंभ- भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर, मेहरुण भागातील राहिलेला परिसर, मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इक्बाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर, अयोध्यानगर, सदगुरूनगर, हनुमाननगर, लीला पार्क, गौरव हॉटेल परिसर.

आणखी वाचा-शासकीय कार्यालयांमध्ये वाढता भ्रष्टाचार; पाच महिन्यात ६९ सापळे, १०६ संशयित अटकेत

सोमवार – नटराज चित्रपटगृह ते चौघुले मळ्यापर्यंतचा भाग, शनिपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ, हाउसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर. गेंदालाल मिल जलकुंभ- खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंग रोड, भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, आकाशवाणी जलकुंभ- जुने गाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ. हेमू कलाणी परिसर जलकुंभ- गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी परिसर. डीएसपी परिसर जलकुंभ- साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगरातील उर्वरित भाग, श्रद्धा कॉलनी, नंदनवननगर, चर्च रोड. १५ इंची व्हॉल्व्ह- प्रभात कॉलनी, ब्रुक बॉण्ड कॉलनी, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसर. नित्यानंदनगर जलकुंभ- समतानगर, स्टेट बँक कॉलनी, धांडेनगर आदी.

मंगळवार – वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड. नित्यानंदनगर जलकुंभ- मोहन नगर, नेहरूनगर परिसर, खंडेरावनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी. मानराज पार्क जलकुंभ- दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी. खोटेनगर जलकुंभ- द्रौपदी नगर, मुक्ताईनर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी, खोटेनगर. गेंदालाल मिल जलकुंभ- शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वरनगर, हिरा पाइप, शंकररावनगर, खेडी गाव परिसर. डीएसपी परिसर जलकुंभ- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर, शिवकॉलनी, विद्युत कॉली, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग, अयोध्यानगर, गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हाउसिंग सोसायटी, जगवानीनगर, मेहरुण, सदाशिवनगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर परिसर आदी.