जळगाव – शहरातील मेहरुण परिसरात महामार्गावरील अमृत योजनेंतर्गत टाकलेल्या बाराशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वाघूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला जोडण्यासाठी ४८ तास लागणार असल्याने २२ आणि २३ जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जळगावकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मेहरुण परिसरातील औरंगाबाद महामार्गावरील कस्तुरी हॉटेलजवळ चौकात अमृत योजनेंतर्गत टाकण्यात आलेल्या बाराशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वाघूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामास ४८ तासांचा कालावधी लागणार असल्याने वेळापत्रकानुसार शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार २२ जानेवारीचा पाणीपुरवठा २४ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे, तसेच २३ आणि २४ जानेवारी या दोन दिवशी होणारा पाणीपुरवठा अनुक्रमे २५ आणि २६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Gas leak causes fire in house in Chembur old person injured
चेंबूरमध्ये गॅस गळतीमुळे घराला आग, वृद्ध व्यक्ती जखमी
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?

हेही वाचा – जळगावसाठी ध्वनिक्षेपक वापरास सवलत देण्याचे दिवस जाहीर

बदललेल्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा

२४ जानेवारी – नटराज चित्रपटगृह ते चौघुले मळा, शनिपेठ, बळीरामपेठ, नविपेठ, हौसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, के. सी. पार्क, गेंदालाल मिल-हुडको, भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, जुने गाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रीम कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, श्रद्धा कॉलनी, नंदनवननगर, प्रभात कॉलनी, ब्रुक बाँड कॉलनी, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, समतानगर, स्टेट बँक कॉलनी, धांडेनगर, मेहरुण, इक्बाल कॉलनी, मिल्लतनगर.

२५ जानेवारी – वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड परिसर, नित्यानंदनगर परिसर, मोहननगर, नेहरूनगर, खंडेरावनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, गायत्रीनगर, नूतनवर्षा काॅलनी, शारदा कॉलनी, दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी. महाविद्यालय परिसर, योगेश्वरनगर, हिरा पाइप व शेकररावनगर, खेडी गाव परिकर, तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग, अयोध्यानगर, गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौसिंग सोसायटी, जगवानीनगर, सदाशिवनगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सानगर, गणेशपुरी, मलिकनगर.

हेही वाचा – नाशिक : गुटख्यासाठी सुरगाण्यातील जंगलातून खैराची तस्करी

२६ जानेवारी – पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा-हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, शिंदेनगर, अष्टभूजा, वाटिकाश्रम परिसरातील उर्वरित भाग, तांबापुरा, श्यामाफायरसमोरील परिसर, जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, नूतनवर्षा कॉलनी, चैत्रबन कॉलनी, आनंदनगर, तिवारीनगर, बाहेती शाळा, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिव कॉलनी व इतर भाग, मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इक्बाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर, सद्गुरूनगर, हनुमाननगर, लीला पार्क.