या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळ्यापासून कोरडेठाक पडणाऱ्या धरणांची यादी पावसाळ्यात देखील विस्तारत असून जिल्ह्यतील २३ पैकी केवळ पाच धरणात सध्या जेमतेम जलसाठा शिल्लक आहे. म्हणजे तब्बल १८ धरण जवळपास कोरडीठाक पडली अथवा त्यांनी तळ गाठला आहे. दमदार पावसाचे

लवकर आगमन न झाल्यास ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जुलैच्या सुरुवातीला जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या १७ टक्के म्हणजे ९३१ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे. उपलब्ध जलसाठा ३१ जुलै आणि गरज पडल्यास १५ ऑगस्टपर्यंत शहराची तहान भागवू शकतो. तथापि, बिकट स्थिती लक्षात घेऊन सर्वानी त्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता आहे. गंगापूर धरण समूहातील काश्यपी व गौतमी गोदावरी रिक्त झाले आहे. तशीच स्थिती पालखेड धरण समूहातील धरणांची आहे. पालखेड धरण कोरडेठाक असून करंजवणमध्ये २४४ तर वाघाडमध्ये ११३ दशलक्ष घनफूट म्हणजे अनुक्रमे पाच व आठ टक्के जलसाठा आहे. ओझरखेड, पुणेगाव व तिसगाव ही धरणे कधीच रिक्त झाली आहेत. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा झालेला नाही. दारणा धरणात १६८ दशलक्ष घनफूट अर्थात केवळ दोन टक्के पाणी शिल्लक आहे. भावली व मुकणे कोरडीठाक असून वालदेवीमध्ये जेमतेम एक टक्का जलसाठा आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असणारे गिरणाबरोबर भावली, नांदूरमध्यमेश्वर, भोजापूर, पूनद व नागासाक्या ही धरणे रिक्त झाली आहेत. चणकापूरमध्ये ५९० आणि हरणबारीमध्ये ४० दशलक्ष घनफूट पाणी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यतील सर्व धरणांमध्ये सध्या २१३३ दशलक्ष घनफूट म्हणजे तीन टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच काळात जलसाठय़ाचे प्रमाण ११ हजार ६२४ म्हणजे १८ टक्के होते. तुलनात्मक विचार केल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येते.

धरणे रिक्त झाल्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा योजनांवर विपरित परिणाम होणार आहे.

पावसाचे आगमन आणखी लांबल्यास इतक्या मोठय़ा संख्येने असणारी निमशहरे व गावांना पाणी पुरवठा कसा करायचा, हा प्रशासनासमोर मुख्य प्रश्न आहे.