लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव: दहिवाळसह २६ गावांसाठी असलेली पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली असून दहा ते पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा करण्याची वेळ आलेल्या संतप्त गावकऱ्यांतर्फे येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरीत पूर्ण करावे,अशी मागणी आंदोलकांनी केली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

दहिवाळसह २६ गावांसाठी युती शासनाच्या काळात गिरणा धरणातून पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर झाली होती. सन २००८ मध्ये प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित झाली. मात्र या योजनेतील अनेक गावांमध्ये महिन्यातून केवळ तीन ते चार वेळा पाणी पुरवठा होतो आणि तोही पुरेसा होत नसल्याची गावकऱ्यांची ओरड आहे. सध्यस्थितीत ही योजना कुचकामी ठरल्याने तिच्या नुतनीकरणासाठी शासनाने दीड वर्षापूर्वी २२ कोटीचा निधी मंजूर केला आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर हे काम सुरु झाले. परंतु नंतर ते लगेच बंद पडले. या कामासाठी ठेकेदाराला २१ महिन्यांची मुदत देण्यात आली असून १४ महिन्यांचा कालावधी उलटला असताना अद्याप बरेच काम बाकी असल्याने ते पूर्ण होण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा-नाशिक: ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट गंभीर

दहिवाळसह २६ गावांसाठी आठवड्यातून एकदा पाणी पुरवठ्याचे नियोजन असले तरी गेल्या काही दिवसांपासून दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने लोकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अर्ज-विनवण्या करूनही प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप आंदोलकांतर्फे करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दहिवाळ योजनेतील गावांना दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत योजनेतील गावांना पाणीपट्टी आकारू नये आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. आंदोलनात आम्ही मालेगावकर संघर्ष समितीचे निखिल पवार, आर.डी निकम, शेखर पवार, सुशांत कुलकर्णी आदी सामील झाले होते.

Story img Loader