धुळे- शहरातील हमाल मापाडी प्लॉट भागात जेसीबी यंत्रामुळे फुटलेली जलवाहिनी आठ दिवसात दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंगळवारी रहिवाशांनी दिला. जलवाहिनी फुटल्यामुळे या भागाचा पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून बंद आहे. याप्रकरणी महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांना निवेदन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रभाग क्रमांक ११ मधील हमाल मापाडी प्लॉट भागात मनमाड जीन पाण्याच्या टाकीवरून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. राजीव गांधी नगरमधून ही जलवाहिनी सांडपाण्याच्या नाल्याच्या खालून गेली आहे. या ठिकाणी महापालिकेतर्फे जेसीबी यंत्राव्दारे नाला साफ सफाईचे काम सुरु असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली. या घटनेला दोन महिने होऊनही जलवाहिनी दुरूस्त करण्यात आली नाही. महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी आठ दिवसात जल वाहिनी दुरुस्तीचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा >>>जळगावातील आकाशवाणी चौकात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

हेही वाचा >>>धुळ्यात ठाकरे गटाचे कांदाफेक आंदोलन; निर्यात शुल्कवाढ रद्द न झाल्यास सत्ताधाऱ्यांना गावबंदीचा इशारा

तथापि दोन महिने उलटूनही काम न झाल्याने या भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. हमाल मापाडी प्लॉट, बजरंग वाडी, कृष्णवाडी या भागातील रहिवाशांना त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्येस सामोरे जावे लागत आहे. निवेदनावर रजनीश निंबाळकर, बाळूभाऊ शेंडगे, अविनाश पाटील, प्रा.संदीप खताळ,अशोक निळे आदींची स्वाक्षरी आहे.