लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरात पाणी पुरवठ्यातील समस्यांवरून निवडणुकीआधी बराच गदारोळ उडाल्यामुळे आचारसंहिता संपताच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पाणी वितरणाशी संबंधित विविध कामे शनिवारी करण्यात येणार असून त्यामुळे या दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

पुणे: शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची होणार स्वच्छता, हे आहे कारण !
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
unsafe drinking water in 55 places in Pune
Pune GBS Updates : पुण्यातील ५५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती
khadakwasla water, khadakwasla ,
‘खडकवासल्या’तील पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष

नाशिक स्मार्ट सिटी कंपनी आणि मनपा पाणी पुरवठा वितरण विभाग यांच्यातर्फे विविध जलशुध्दीकरण केंद्र आणि सहायक केंद्रांवर प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे यासह इतर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रात उच्चदाब खांब स्थलांतरीत करणे, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात प्रवाह मीटर बसविणे, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर, व्हॉल्व्ह बसविणे, शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी प्रवाह मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या शिवाय सहायक जलशुध्दीकरण केंद्रात याच स्वरुपाची कामे केली जातील.

आणखी वाचा-मागणी मतदान यंत्र-व्हीव्ही पॅट चिठ्ठ्या पडताळणीची, प्रशासकीय तयारी मतदान प्रात्यक्षिकांची

सातपूर विभागातील मुख्य वाहिनीवर व्हॉल्व्ह आणि पाणी मापक मीटर बसविणे, सातपूर प्रभाग क्रमांक नऊमधील कार्बन नाका येथील वाहिनीची गळती थांबविणे, प्रभाग १० मधील अशोकनगर येथे गळती लागलेल्या ९०० मिलिमीटर वाहिनीची दुरुस्ती, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक येथील जलवाहिनीची दुरुस्ती, पाथर्डी फाटा येथील व्हॉल्व्ह दुरुस्ती, कशिश हॉटेलजवळील जलवाहिनीवरील व्हॉल्व्हची गळती बंद करणे तसेच हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंदनगर कुंभाच्या वाहिनीवरील गळती बंद करणे. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत वासन नगर, राणेनगर, पाथर्डी फाटा येथील जलवाहिन्यांवर व्हॉल्व्ह बसविणे व तत्सम कामे केली जातील. नाशिकरोड विभागातील उपनगर येथील संजय गांधी नगर वाहिनीतील गळती आणि पवारवाडी जलकुंभ भरणाऱ्या वाहिनीची जेलरोड सिग्नलजवळ गळती बंद करण्याची कामे करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा-दादा भुसे उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?

नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

व्यापक स्वरुपातील कामांमुळे शनिवारी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत शहरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाहूी. रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. शनिवारी दिवसभर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader