लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: नाशिकरोड विभागातील गोदावरी जलकुंभ भरणाऱ्या ६०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे उपरोक्त जलकुंभावर होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी प्रभाग क्रमांक १७, १८, १९ आणि २० मध्ये बुधवारी सकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. सायंकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
नाशिकरोड येथील जलकुंभाला पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीची गळती थांबविण्यासाठी एक दिवस पाणी पुरवठा बंद करणे आवश्यक असल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे.
बुधवारी सकाळी प्रभाग क्रमांक १७ मधील कॅनाल रोड परीसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, टाकळी रोड, भिमनगर, प्रभाग क्रमांक १८ मधील शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर. प्रभाग १९ मधील गोरेवाडी, शास्त्रीनगर, प्रभाग क्रमांक २० मधील पुणे रोड परिसर, रामनगर, विजयनगर, शाहु नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कलानगर, आशानगर, जिजामाता नगर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सायंकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याची नागरीकांनी नोंद घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.