नाशिक – राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास निमंत्रण न मिळाल्याचे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. राम मंदिर आंदोलनाचे आपण स्वत: साक्षीदार आहोत. दोनवेळा आपण कारसेवेत सहभागी झालो. २० दिवस कारागृहात होतो. उद्धव ठाकरे हे तेव्हा घरात बसले होते. ते कधीही अयोध्येत आले नाहीत. त्यांचा आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही. राम मंदिर उभारणीत त्यांचे योगदान काय, असा प्रश्न ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. त्यामुळे बोलावले काय आणि नाही बोलावले काय, त्यांना इतके वाईट वाटण्याचे कुठलेही कारण नसल्याचा टोला महाजन यांनी हाणला.

राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना न दिल्यावरून ठाकरे गटाकडून भाजपाला लक्ष्य केले जात आहे. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर महाजन यांनी संपूर्ण देश व जगाला माहिती आहे की, कारसेवक कोण होते. ठाकरे यांच्याकडून केवळ स्वत:चा ढोल वाजवला जात आहे. सरकारसाठी ते अतिविशेष व्यक्ती नसतील याकडे लक्ष वेधले. त्र्यंबकेश्वर मंदिरात सलग सुट्यांमुळे मोठी गर्दी उसळली आहे. चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे. या संदर्भातील प्रश्नावर त्यांनी या आठवडाभरात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले. त्र्यंबकेश्वर गावातील अतिक्रमण निर्मुलन, मंदिर परिसराचे सुशोभिकरण केले जाईल. मागील कुंभमेळ्यावेळी कुंभमेळा तयारीला महिनाभराचा अवधी मिळाला होता. यावेळी पुन्हा सिंहस्थाची जबाबदारी आपल्यावर टाकण्यात आली आहे. पुरेसा वेळ असल्याने चांगले नियोजन केले जाईल. मागील सिंहस्थात चेंगराचेंगरी व कुणी हरवल्याचे एकही प्रकरण झाले नाही. अल्पावधीत चांगले नियोजन झाले होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात देशात आजवर जेवढे कुंभमेळे झाले, त्यात आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात सर्वात चांगली रचना व नियोजन केले जाणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले.

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
uddhav thackeray shiv sena leader ex mla rupesh mhatre join eknath shinde shiv sena
ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात चार संशयितांकडून तलवार, कुऱ्हाड जप्त

धार्मिक स्थळांकडे भाविकांचा ओढा वाढत आहे. देशभरातील मंदिरांचे चित्र बदलत आहे. देश व राज्यातील सरकार मंदिरांचे जतन करणारे, त्यात सुंदरता आणणारे आहे. यामुळे पुढील सिंहस्थात भाविकांची प्रचंड गर्दी होईल. जगभरातून आलेल्या भाविकांना चांगले वाटले पाहिजे यादृष्टीने तयारी केली जाईल. राज्यातील ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आधी दोन कोटींचा निधी दिला जायचा. त्यात नुकतीच पाच कोटींपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा – नाशिक : जिलेटिनची अवैध वाहतूक, तीन संशयित ताब्यात

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाची वेळ येणार नाही इतक्या गतीने राज्य सरकार काम करीत आहे. मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात आहे. भुजबळ-जरांगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी दोन समाजांत दुफळी निर्माण होत आहे. भुजबळ व जरांगे या दोघांना टिका-टिपण्णी थांबविण्यास सांगितले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावला जाणार नसल्याचे सरकारने आधीच स्पष्ट केलेले असल्याचा दाखला महाजन यांनी दिला.