लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय बँका अनेक असतात. परंतु, जळगावात सध्या एक बँक उदघाटनापासून चर्चेत आली आहे. या बँकेच्या उदघाटनाची इतकी चर्चा होण्याचे कारणही तसेच आहे. या बँकेशी संबंध केवळ माता आणि बाळ यांचा आहे.

if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
world top leaders of polluting countries missing at united nations climate talks
प्रदूषणकर्त्या देशांचे सर्वोच्च नेतेच परिषदेला अनुपस्थित; हवामान बदलाच्या समस्येवर गांभीर्याने विचार होत नसल्याची चर्चा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
supreme-court-
Supreme Court on firecracker ban: फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं विधान; धर्माचा उल्लेख करत सरकारला सुनावलं…

जिल्हा रुग्णालयात रविवारी मदर मिल्क बँकेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा चव्हाण, डॉ. मनोज पाटील, रक्तपेढीचे तज्ज्ञ डॉ. आकाश चौधरी, महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-दहेजची रक्कम ५१ हजार रुपयांपेक्षा अधिक घेतल्यास….

अनेक शिशूंना आईचे दूध मिळत नाही. प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसे दूध येत नाही, काहींना उपचारामुळे शिशूंना दूध पाजता येत नाही. अशावेळी शिशूंना गायीचे अथवा पावडरचे दूध पाजण्याची वेळ ओढवते; परंतु शिशूंना आईचेच दूध मिळावे, यादृष्टीने ह्युमन मिल्क बँक जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून साकारण्यात आल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.

बाळासाठी आईच्या दुधाचे वेगळे महत्त्व आहे. मात्र, बाळाचे पोट भरेल इतके दूध आईला येणे, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे, तर पहिल्यांदा आई होणार्‍या अनेक महिलांना दूध कमी येण्याची समस्या निर्माण होते. एका अभ्यासातून उघड झालेल्या आकडेवारीनुसार ७५ महिला प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काही महिन्यांतच बाळाला स्तनपान करणे सोडतात. विशेष म्हणजे आईला दूध कमी आल्यास त्याचे परिणाम बाळाच्या पोषणावर होते. अनेकदा यामुळे बाळाचे पोट भरत नाही, तर भूक लागल्याने बाळ चिडचिड करतात, रडत असतात. त्यामुळेच आईच्या दुधाची बाळाला कमतरता भासू नये, हे खूप महत्त्वाचे असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलजा चव्हाण यांनी सांगितले.

आणखी वाचा-बांगलादेशला ५० हजार तर, यूएईला १४,४०० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी

याप्रसंगी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मदर बिल्क बँक कार्यान्वित केल्यानंतर प्रत्येक यंत्राची पाहणी करून त्याची कार्यपद्धती बालरोगतज्ज्ञ डॉ. चव्हाण यांच्याकडून जाणून घेतली.