जळगाव – जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचा उमेदवार कोण, हे अद्यापही निश्चित होत नसल्याने मित्रपक्षांसह महायुतीतील घटक पक्षांनाही उत्सुकता लागून आहे. भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासह प्रचार नियोजनासंदर्भात शनिवारी ठाकरे गट आणि शरद पवार गटातील पदाधिकार्यांची बैठक झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडे गेला आहे. पक्षातर्फे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ आणि पक्षात नुकत्याच प्रवेश केलेल्या अमळनेर येथील अॅड. ललिता पाटील यांची नावे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. विरोधी पक्षातील मोठा नेताही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत असून, त्याबाबतही विचार सुरू असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन सात दिवस उलटले, तरी ठाकरे गटाचा उमेदवार ठरलेला नाही.
हेही वाचा – विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम
ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत हे स्वपक्षाच्या पदाधिकार्यांसह महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करीत आहेत. त्यांनी प्रथम माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांची भेट घेतली. यावेळी बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे, पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, लोकसभेसाठी इच्छुक कुलभूषण पाटील, शरद पवार गटाच्या सहकार आघाडीचे अध्यक्ष वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर सावंत यांनी अमळनेर येथे काँग्रेसचे डॉ. अनिल पाटील यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी इच्छुक अॅड. ललिता पाटील उपस्थित होत्या. सावंत यांनी शरद पवार गटाचे पारोळा येथील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तसेच इतर नेत्यांची भेट घेतली. यावेळी आघाडीतील तीन पक्षांनी एकत्रित लढण्याचे निश्चित करून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जागा जिंकण्याचा निर्धार केला.
हेही वाचा – शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!
महाविकास आघाडीतर्फे शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात शनिवारी बैठक घेण्यात आली. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सावंत, शरद पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीला ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, इच्छुक उमेदवार अॅड. ललिता पाटील व माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, मंगला पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा – मुलाच्या ‘कल्याणा’साठी मुख्यमंत्र्यांचे सारे काही
बैठकीनंतर ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जळगाव लोकसभेच्या उमेदवाराबात अद्याप निश्चिती झालेली नाही. मात्र, पक्षातर्फे तीन उमेदवार इच्छुक आहेत. त्याबाबत निर्णय होणार आहे. याशिवाय, बाहेरच्या पक्षातील मोठा नेताही इच्छुक आहे; परंतु उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, हेच जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.