नाशिक – बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सारडा सर्कल भागात लागलेल्या फलकावर गुलशनाबादचा उल्लेख असल्याचे समोर आल्याने इतर शहरांप्रमाणे नामांतराचे लोण नाशिकमध्येही आले की काय, अशी चर्चा रंगली आहे. गुलशनाबाद कोणाला प्रिय, असा प्रश्नही केला जात आहे. हा फलक त्वरीत हटविला गेला. यानिमित्ताने गुलशनाबाद या नावामागे दडलेल्या नाशिकच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे.

गोदावरीच्या काठावर वसलेले नाशिक पुरातन काळापासून सुजलाम सुफलाम आहे. प्रदीर्घ काळ नाशिकवर मुगलांचे वर्चस्व होते. त्या काळात हा परिसर गुलाब, शेवंती आणि निशीगंधाच्या बागांनी बहरलेला होता. या बागांमुळे गुलशनाबाद अशी शहराची ओळख निर्माण झाल्याचा इतिहास सांगितला जातो. परिसरातील फुलशेतीने प्रभावित झालेल्या तत्कालीन शासकांनी पार्शियन गुलाबदेखील येथे आणला. त्याची लागवड केली. नाशिकचे हवामान त्याला चांगलेच मानवले. त्याची शेती फुलली. फिक्कट गुलाबी रंगाचा आणि सुगंध दरवळणारा दमास्क गुलाब म्हणून तो ओळखला जातो, असे या क्षेत्रातील अभ्यासक सांगतात.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
nashik police intervention in dispute
नाशिक : सिडकोत प्रार्थनास्थळावरील वादात पोलिसांची मध्यस्थी
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
Crowd of devotees take bath in Ramkund due to Mauni Amavasya
नाशिक : मौनी अमावास्येमुळे रामकुंडात स्नानासाठी भाविकांची गर्दी
Two people died in accident on Peth road nashik
नाशिक : पेठ रस्त्यावरील अपघातात दोन जणांचा मृत्यू
Two attempted self immolations occurred in Jalgaon and Nashik districts on Republic Day January 26
जळगाव, नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी दोघांचा पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
leopard death deolali camp loksatta news
नाशिक : देवळाली कॅम्पात बिबट्या मृतावस्थेत

हेही वाचा – रक्तमिश्रित पाणी नदीपात्रात, मालेगावात आंदोलन

दमास्क गुलाब आजही विविध प्रकारांत उपलब्ध आहे. या गुलाबाच्या पाकळ्यांचा मुख्यत्वे वापर केला जातो. त्या बहरल्यानंतर पाकळ्या अधिक काळ देठावर राहत नाही. पेशवेकाळात या भागाचे नाशिक असे नामकरण झाल्याचे सांगितले जाते. ब्रिटीश काळात त्याच नावाचा जिल्हा अस्तित्वात आला. या संपूर्ण घटनाक्रमात आजही स्थानिक पातळीवर फुलांची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असली तरी गुलशनाबाद नाव कधीच मागे पडले आहे. सध्या देशासह राज्यात शहरे, रस्ते, चौकांची नावे बदलली जात आहेत. ईदनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या एका फलकावर नाशिकऐवजी गुलशनाबाद असा उल्लेख एका मंडळाने केल्याने त्याविषयी चर्चा रंगली आहे

Story img Loader