नाशिक – बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सारडा सर्कल भागात लागलेल्या फलकावर गुलशनाबादचा उल्लेख असल्याचे समोर आल्याने इतर शहरांप्रमाणे नामांतराचे लोण नाशिकमध्येही आले की काय, अशी चर्चा रंगली आहे. गुलशनाबाद कोणाला प्रिय, असा प्रश्नही केला जात आहे. हा फलक त्वरीत हटविला गेला. यानिमित्ताने गुलशनाबाद या नावामागे दडलेल्या नाशिकच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे.
गोदावरीच्या काठावर वसलेले नाशिक पुरातन काळापासून सुजलाम सुफलाम आहे. प्रदीर्घ काळ नाशिकवर मुगलांचे वर्चस्व होते. त्या काळात हा परिसर गुलाब, शेवंती आणि निशीगंधाच्या बागांनी बहरलेला होता. या बागांमुळे गुलशनाबाद अशी शहराची ओळख निर्माण झाल्याचा इतिहास सांगितला जातो. परिसरातील फुलशेतीने प्रभावित झालेल्या तत्कालीन शासकांनी पार्शियन गुलाबदेखील येथे आणला. त्याची लागवड केली. नाशिकचे हवामान त्याला चांगलेच मानवले. त्याची शेती फुलली. फिक्कट गुलाबी रंगाचा आणि सुगंध दरवळणारा दमास्क गुलाब म्हणून तो ओळखला जातो, असे या क्षेत्रातील अभ्यासक सांगतात.
हेही वाचा – रक्तमिश्रित पाणी नदीपात्रात, मालेगावात आंदोलन
दमास्क गुलाब आजही विविध प्रकारांत उपलब्ध आहे. या गुलाबाच्या पाकळ्यांचा मुख्यत्वे वापर केला जातो. त्या बहरल्यानंतर पाकळ्या अधिक काळ देठावर राहत नाही. पेशवेकाळात या भागाचे नाशिक असे नामकरण झाल्याचे सांगितले जाते. ब्रिटीश काळात त्याच नावाचा जिल्हा अस्तित्वात आला. या संपूर्ण घटनाक्रमात आजही स्थानिक पातळीवर फुलांची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असली तरी गुलशनाबाद नाव कधीच मागे पडले आहे. सध्या देशासह राज्यात शहरे, रस्ते, चौकांची नावे बदलली जात आहेत. ईदनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या एका फलकावर नाशिकऐवजी गुलशनाबाद असा उल्लेख एका मंडळाने केल्याने त्याविषयी चर्चा रंगली आहे