दिवसागणिक कमी होणारे वनक्षेत्र वृद्धिंगत करण्याबरोबर वन्यजीवांच्या संरक्षणार्थ अहोरात्र काम करणारे ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक तथा नेचर कन्झव्‍‌र्हेशन सोसायटीचे अध्यक्ष बिश्वरूप ब्रह्मभ्रता रहा (६२) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी आहे. दोनशे वर्षांत नाशिकमध्ये प्रथमच दिसलेला ‘फॉरेस्ट ऑव्लेट’ असो, की नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ‘माळढोक’चे ओझरलगतचे अस्तित्व असो. दुर्मीळ पक्ष्यांना धुंडाळणाऱ्या रहा यांनी नाशिकमधील  गवताळ, जंगली आणि पानथळातील पक्ष्यांची सचित्र सूची ‘बर्ड्स ऑफ नाशिक’मधून समोर आणली.

काही महिन्यांपूर्वी रहा यांना अर्धागवायूचा झटका आला होता. मुंबई येथील रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. तीन दिवसांपूर्वी ते नाशिकमध्ये परतले. गंगापूर धरणालगतच्या शेतातील राहत्या घरात सकाळी रहा यांचे निधन झाल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. जिल्ह्य़ातील पर्यावरण, वन्यजीवांचा सखोल अभ्यास हे रहा यांचे वैशिष्टय़. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी शालेय विद्यार्थी, तरुणांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. विविध उपक्रमांमधून लाखो विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

Kelzar, Leopard died Wardha, Leopard latest news,
वर्धा : प्रजननकाळच बिबट्यांच्या जीवावर उठतोय, जंगल सोडून रस्त्यावर येतात, आणि….
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Loksatta Ganeshotsav Quiz
लोकसत्ता गणेशोत्सव क्विझच्या विजेत्यांचा सन्मान
what is livestock census
प्राण्यांची गणना का केली जाते? त्यामागचे उद्दिष्ट काय?
Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market Pune news
पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट
A decision to examine scholars in the city pune Municipal Commissioner order to fire brigade
शहरातील अभ्यासिकांची तपासणी करण्याचा मोठा निर्णय, नक्की कारण काय ? महापालिका आयुक्तांचा अग्निशमन दलाला आदेश
maharashtra government to regularize land transactions which violated fragmentation of land law
विश्लेषण : तुकडेबंदी व्यवहारांचे भविष्य काय?
aishwarya narkar bought new home
Video : ऐश्वर्या नारकरांनी घेतलं नवीन घर! पहिल्यांदाच दाखवली झलक, दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी

गंगापूर धरणालगतच्या स्वत:च्या जागेत पक्षी निरीक्षणाची सुविधा उभारली. जिल्ह्य़ातील पक्ष्यांची माहिती देणारे प्रदर्शन थाटले. वन्यजीव, पक्षी अभ्यासासाठी रानोमाळ भटकंती केली. नामशेष होण्याच्या मार्गावरील दुर्मीळ पक्ष्यांचे अस्तित्व पुराव्यासह समोर आणले. दुर्मीळ होणाऱ्या माळढोकचे ओझरलगतचे अस्तित्व हा त्याचाच एक भाग. ‘फॉरेस्ट ऑव्लेट’ हा पक्षी २०० वर्षांत कधी नाशिक परिसरात दिसलेला नव्हता. रहा यांच्या अभ्यासातून त्याचे प्रथमच दर्शन झाले. डेहराडूनच्या वन्यजीव संस्थेसोबत पक्ष्यांना रिंग लावण्याच्या उपक्रमात ते सहभागी झाले. वाइल्ड लाइफ वॉर्डन म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. बर्ड ऑफ नाशिकमधून जिल्ह्य़ातील पक्ष्यांवर प्रकाशझोत टाकला. सलीम अली आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत रहा यांनी पहिले पारितोषिकही पटकावले होते. रहा यांच्या निधनामुळे निसर्ग संरक्षणासाठी झटणारा कार्यकर्ता गमावल्याची भावना उमटत आहे.

बोरगडचे निसर्ग शिक्षण

जंगलांचे कमी होणारे प्रमाण या मुद्दय़ावर चर्चा होते, परंतु वनक्षेत्र कसे वाढविले जाईल, यावर फारसे कुणी काम करीत नाही. रहा यांनी त्यास छेद दिला. आपल्या नेचर कन्झव्‍‌र्हेशन सोसायटीच्या माध्यमातून बोरगड येथील ‘मिहद्रा हरियाली’ प्रकल्प त्याचे निदर्शक आहे. बोरगडला पर्यावरण, निसर्ग शिक्षण देणारे केंद्र म्हणून पुढे आणण्याची त्यांची इच्छा होती. पेठ रस्त्यावरील कधीकाळी उघडाबोडका असणारा डोंगर रहा यांच्या अथक प्रयत्नातून आज तब्बल ८० हजारहून अधिक वेगवेगळ्या प्रजातींची झाडे, वनस्पती, जंगली फुलांनी बहरला आहे. विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींच्या गटाला अनोखी निसर्गसफर घडविण्याची व्यवस्था केली आहे.