लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास पोलिसांनी सुक्ष्म नियोजनावर भर देत बंदी घातली आहे.
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात शनिवारी सकाळपासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी केंद्र तसेच मतदार संघात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलिसांच्या वतीने सुक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ११ मतदार संघांमध्ये १४०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून नऊ उपअधीक्षक, ३२ निरीक्षक, शीघ्रकृती दलासह वेगवेगळ्या दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान यंत्र असलेल्या स्ट्राँग रूम परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मनमाड, मालेगाव, नांदगाव या ठिकाणी संवेदनशील भागात अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. आचारसंहिता असल्याने विजयी मिरवणुकांविषयी अद्याप कोणताही आदेश नसल्याने मिरवणूक काढण्यास बंदी आहे.
आणखी वाचा-नाशिक पश्चिममध्ये मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यांच्यात बदल ठाकरे गटाचा आरोप
शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य तसेच देवळाली या मतदार संघात शनिवारी पोलिसांकडून गस्तीवर भर देण्यात येणार आहे. याशिवाय राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचे संपर्क कार्यालय, निवासस्थान अशा ठिकाणीही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. शहरातही विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.