लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनमाड : शहरातील ३७ वर्षीय मनोरुग्ण मुलाच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्याने काही वेळाने आईचाही मृत्यू झाला. माय-लेकांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.

येथील डॉ.आंबेडकर चौकात झाल्टे कुटूंब राहाते. कुटूंबातील मनोरुग्ण असलेल्या मुकेश यास आईवडील व्यवस्थित सांभाळत होते. पतीच्या निधनानंतर तिशी ओलांडलेल्या मुकेशचे पुढे कसे होणार, या चिंतेने साकुबाई (७६) यांना ग्रासले होते. जीवापाड जपलेल्या मुकेशचा मृत्यू झाला. मुकेशच्या लहान बहिणीचाही आधीच मृत्यू झाला होता. कायम मुकेशची पाठराखण करणाऱ्या साकुबाई यांना मुकेशच्या मोठ्या भावाने मुकेशचा मृत्यू झाल्याचे सांगताच धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला.

आणखी वाचा-प्रत्येक प्रभागात सक्रिय होण्याची गरज, शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत शिवसैनिकांना सूचना

सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांनी मुकेशचा मोठा भाऊ, बहीण आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे सांत्वन केले. अमरधाम स्मशानभूमीत साकुबाई आणि मुलगा मुकेश यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.