स्वयंपाक करत असतांना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरावरील पत्रे उडाल्याने आईसह तीन मुलं गंभीर जखमी झाले. नारायणबापू नगर परिसरात हा प्रकार घडला.नारायणबापू नगर येथील लोखंडे मंगल कार्यालयासमोर पुंजाजी लोखंडे यांच्या मालकीची पत्र्याची चाळ आहे. या चाळीतील खोल्यांमध्ये अनेक भाडेकरु राहतात. त्यात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी सुगंधा सोळंकी (२४) या शाळेची तयारी करणाऱ्या मुलांना डब देण्याच्या धावपळीत असतांना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरावरील पत्रे उडाले. स्फोटामुळे लागलेल्या आगीत सुगंधा या ५० टक्के भाजल्या. त्यांची मुले रुद्र (पाच), आर्यन आणि सूर्या हेही जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>जळगाव: गोद्रीतील महाकुंभ म्हणजे बंजारा समाजाच्या अस्मितेचा हुंकार – बाबूसिंग महाराज यांचे प्रतिपादन

सकाळी हा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या मुख्यालयातून बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाला. पथकाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. नागरीकांनीही त्यासाठी सहकार्य केले. जखमी मुलांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुगंधा यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman and three sons injured in gas cylinder explosion nashik news amy