देवळा परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देवळा येथील हेमंत सागर (४०) हे पत्नी वैशाली (३८) यांच्यासह काही कामानिमित्त इंडिका मोटारीने निवाणे येथे निघाले होते. देवळा-निवाणे रस्त्यावरील एका वळणावर समोरून येणाऱ्या मोटारीच्या प्रकाशझोतामुळे हेमंत यांचे नियंत्रण सुटले आणि पुढील काही अंदाज न आल्याने त्यांची गाडी झाडावर धडकली. या अपघातात वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला तर हेमंत हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैशाली यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हेमंत हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader