नाशिक – तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना ५५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…तर पंकजा मुंडेंबरोबर युती करू”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

हेही वाचा – लाचखोर जीएसटी अधिकाऱ्यास पोलीस कोठडी

नवीन नाशिक येथील निर्मला जगताप या मुलगा, सून आणि नातू यांच्या समवेत श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वर येथे गेल्या होत्या. प्रदक्षिणा पूर्ण करीत असताना चक्कर आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman died while performing brahmagiri pradakshina ssb