लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: सिटीलिंक या शहर बसमधून प्रवास करत असताना बुधवारी सायंकाळी रविवार कारंजा परिसरात बसमधून उतरताना महिला पडल्याने जखमी झाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिटीलिंक बसमधून पुष्पा पुणतांबेकर (७५, रा. हिरावाडी) या पंचवटी ते भगूर या मार्गाने प्रवास करत होत्या. सायंकाळी रविवार कारंजा परिसरात बस आली असता त्या खाली उतरल्या. उतरताना बसच्या स्वयंचलित दारात पुणतांबेकर यांचा पदर अडकला. त्यामुळे त्या बसच्या मागील चाकाच्या बाजूस पडल्या. त्या जखमी झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.