धर्मांतराचे प्रलोभन दाखवत ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिच्या मुलांना भीक मागण्यास भाग पाडल्याचा प्रकार सिन्नर येथे उघडकीस आला. या प्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हेही वाचा – भुसावळच्या रस्त्यांवर चार्ली चॅप्लीन ;शहरवासियांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती

nashik elderly couple death
नाशिक : सोमेश्वरजवळील अपघातात ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू
nashik youth murder latest marathi news
नाशिक : अमृतधाम परिसरात युवकाच्या हत्येमुळे तणाव, जमावाकडून…
nashik vidhan sabha election 2024 marathi news
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मताधिक्याचा चढता-उतरता आलेख
nashik farmer death marathi news
नाशिक : फवारणीवेळी औषध नाकात गेल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू
nashik salher fort murder
नाशिक : जमिनीच्या वादातून साल्हेर किल्ल्यावर दुहेरी हत्याकांड
16 candidates saved their deposit nashik
नाशिक जिल्ह्यात केवळ १६ उमेदवारांना अनामत वाचविणे शक्य
nashik vidhan sabha marathi news
नाशिकमध्ये ज्येष्ठतेच्या निकषावर मंत्रिपद देताना कसरत, भाजपला गतवेळची कसर भरून काढण्याची संधी
north Maharashtra vidhan sabha election result
उत्तर महाराष्ट्रात मविआच्या चारचौघी पराभूत, महायुतीच्या तिघी विजयी

हेही वाचा – नाशिक : अल्पवयीन मुलांना गुटखा विकणाऱ्या टपरी चालकांविरुद्ध कारवाई

सिन्नर परिसरात कामाच्या शोधात आलेली महिला गावातील एका मंदिराजवळ मुलांसोबत राहत होती. मोलमजुरी करून कुटुंबासाठी पैसे कमवित असतांना काही जण तिच्या संपर्कात आले. त्यांनी धर्मांतराचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन केला. यामध्ये बुट्टी, प्रेरणा, भाऊसाहेब उर्फ भावड्या दोडके, राहुल आणि एका अनोळखीचा समावेश आहे. राहुलने धर्मांतराचा बहाणा करून महिलेला गुलाबी रंगाचे पाणी पाजले असता तिला गुंगी आली. त्यानंतर संशयितांनी तिला डांबून ठेवत अत्याचार केले. मुलांना भीक मागण्यासाठी शिवीगाळ, मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे.