नाशिक : शहरातील गोविंद नगरात शुक्रवारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.गोविंद नगरातील आरडी सर्कल येथे विराज इस्टेट या इमारतीचे बांधकाम चालु आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विश्वजीत विश्वास ( २०,रा. पश्चिम बंगाल) हा कामगार १४ मजल्यावर काम करत असताना लोखंडी पट्टी त्याच्यावर पडली. त्यामुळे विश्वजीत लोखंडी पट्टीसह कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, नाशिक महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी गगनचुंबी इमारतींचे बांधकाम होत असले तरी कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वारंवार दिसत आहे. अशा इमारतींवर बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार वर्ग हा बहुसंख्य प्रमाणात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल अशा राज्यांमधून आणले जातात.

Story img Loader