Yeola Vidhan Sabha Election 2024 : २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. येवला तालुका, २. निफाड तालुक्यातील लासलगांव आणि देवगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. येवला ( Yeola ) हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो. येवला या मतदारसंघावर कायमच छगन भुजबळ यांचं वर्चस्व राहिलं आहे. येवला हा मतदारसंघ एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यानंतर शिवसेनेनेही वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. मात्र २००४ मध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना इथून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी येवला ( Yeola ) मतदारसंघाची ओळख झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने २०२४ च्या निवडणुकीत माणिकराव शिंदेंना या मतदारसंघातून छगन भुजबळांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदा काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

छगन भुजबळ यांची येवल्यातल्या राजकारणावर पकड

छगन भुजबळ हे सध्या या मतदारसंघातले आमदार आहेत. छगन भुजबळ यांची ओळख महाराष्ट्राला नवी नाही. सुरुवातीला शिवसेनेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले छगन भुजबळ हे राज्यातले दिग्गज नेते मानले जातात. आघाडीच्या काळात त्यांनी गृहमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. सध्या त्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे आणि छगन भुजबळ अजित पवारांबरोबर सत्तेत आहेत. शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत असं मात्र ते कायमच सांगत असतात. बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचं वॉरंटही त्यांनी काढलं होतं. बाळासाहेब ठाकरे हे कायम त्यांचा उल्लेख लखोबा लोखंडे असा करत. कालांतराने हे सगळे गैरसमज दूर झाले आणि बाळासाहेब ठाकरेंनीही त्यांना माफ केलं. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता होती. त्या कालावधीत काही काळ त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. आता छगन भुजबळ विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत. तसंच मनोज जरांगेंशी झालेल्या वादांवरुन आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे त्यांची चर्चाही झाली होती.

mla ravindra wife likely to contest assembly polls against close friend anant nar in jogeshwari east constituency
जोगेश्वरी पूर्वमध्ये गुरु शिष्य लढाई होणार ? वायकरांच्या मतदार संघात एकेकाळचा कार्यकर्ता अनंत नर लढणार ?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Sharad Pawar and Uddhav Thackeray candidate list for vidhan sabha Election
Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात दिला उमेदवार, वाद होण्याची शक्यता?
marathwada assembly elections
‘कमळा’ची लढत ‘मशाल’ टाळून, मराठवाड्यात भाजपला ठाकरे गटाचे आव्हान कमी; दोनच जागांचा अपवाद
Chhagan Bhujbal on Sameer Bhujbal
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ मविआच्या वाटेवर? ठाकरेंच्या तिकीटावर विधानसभा लढणार? छगन भुजबळ म्हणाले…
Prakash Govind Mhatre
कल्याण ग्रामीण शिंदे शिवसेनेचे प्रकाश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
amit shah meets mahayuti leaders in delhi to sort out seat sharing issue
मित्रपक्षांपुढे भाजपचे नमते? अमित शहांबरोबर साडेतीन तास चर्चा; २० ते २३ जागांवरील अद्याप तिढा कायम

२००९ मध्ये भुजबळांनी कुणाचा पराभव केला?

२००९ मध्ये छगन भुजबळ यांनी १ लाख ६ हजार ४१६ मतं मिळवत या मतदारसंघात विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या माणिकराव माधवराव शिंदे पाटील यांचा पराभव केला. शिंदे पाटील यांना २००९ च्या निवडणुकीत ५६ हजार २३६ मतं मिळाली होती. एकूण मतांच्या ६३ टक्के मतं मिळवून छगन भुजबळ या मतदारसंघातून विजयी झाले. पुढे २०१४ आणि २०१९ या दोन निवडणुकांमध्येही त्यांचंच वर्चस्व दिसून आलं.

हे पण वाचा- सुहास कांदेंविरोधात गुन्हा; नांदगावमधील अपक्ष उमेदवारीमुळे कांदे-भुजबळ वादाला धार

२०१४ ची स्थिती काय होती?

२०१४ मध्ये छगन भुजबळ यांना १ लाख १२ हजार ७८७ मतं मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. संभाजी पवार यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६६ हजार ३४५ मतं मिळाली. एकूण मतदानाच्या ५८ टक्के मतं ही त्या विधानसभेत छगन भुजबळ यांना मिळाली.

२०१९ मध्ये काय निकाल लागला?

२०१९ मध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना शिवसेनेच्या संभाजी पवार यांनी टक्कर दिली. पण ते छगन भुजबळ यांना हरवू शकले नाहीत. छगन भुजबळ यांना २०१९ च्या निवडणुकीत १ लाख २६ हजार २३७ मतं मिळाली. तर संभाजी पवार यांना ६९ हजार ७१२ मतं मिळाली.

पैठणीसाठीही येवला लोकप्रिय

येवला ( Yeola ) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला ( Yeola ) तालुक्याचे छोटे शहर आहे. येथे हातमागावरील जगप्रसिद्ध पारंपरिक पैठणी विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी यंत्रमाग वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी येवला प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठणी साड्या निर्यातही होतात. येवल्याची महाराष्ट्रातली ओळख ही पैठणीमुळे निर्माण झाली आहे यात काही शंकाच नाही.

येवल्यात बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक घोषणा

“मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही” ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे प्रथम केली होती, त्या ठिकाणी २०१४ मुक्तिभूमी स्मारक निर्माण केले गेले. नाशिक जिल्ह्यातील एक दुष्काळी तालुका म्हणून देखील ओळख आहे कांदा पीक इथे मोठ्या प्रमाणत घेतले जाते.