Yeola Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातली निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीनंतर एक्झिट पोल्स आले त्यानुसार भुजबळ मैदान मारतील अशी चिन्ह होती. एक्झिट पोल्सचा कौल महायुतीच्या बाजूने होता. २३ तारखेला लागलेल्या निकालात छगन भुजबळ २६ हजारांहूनन अधिक मतांनी विजयी झाले आहेत. २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. येवला तालुका, २. निफाड तालुक्यातील लासलगांव आणि देवगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. येवला ( Yeola ) हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो. येवला या मतदारसंघावर कायमच छगन भुजबळ यांचं वर्चस्व राहिलं आहे. येवला हा मतदारसंघ एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यानंतर शिवसेनेनेही वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. मात्र २००४ मध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना इथून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी येवला ( Yeola ) मतदारसंघाची ओळख झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने २०२४ च्या निवडणुकीत माणिकराव शिंदेंना या मतदारसंघातून छगन भुजबळांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदा काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा