लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : देवळा तालुक्यातील कांचने शिवारात असलेल्या नागोणे धरणात युवकाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेविषयी देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

आणखी वाचा-नाशिक: खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी मनपाचा ३४ कोटींचा बार

कांचने येथील संदीप पिंपळे ( २७ ) हा तरुण रविवारी दुपारी चारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या नागोणे धरणात मासे पकडण्यासाठी गेला होता. त्याला धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. याची माहिती पोलीस पाटील दिंगबर सोनवणे यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोमवारी स्थानिकांच्या मदतीने पिंपळे याचा मृतदेह धरणातून बाहेर काढला. देवळा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पिंपळे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे.

Story img Loader