लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: जिल्ह्यात गुरुवारी गणेश विसर्जनादरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील पाझर तलावात रात्री उशिरा ३० वर्षीय तरुण बुडाला.

अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून प्रशासनातर्फे बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. फिरीशा पवार ( रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

Story img Loader