जळगाव – जामनेर शहरानजीक भवानी घाटात शनिवारी सकाळी मोटार आणि दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, तर पाचजण जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जामनेर शहरानजीकच्या भवानी घाटातील रामवन मंदिरासमोरील रस्त्यावर उज्जैन येथून छत्रपती संभाजीनगर येथे जाणारी मोटार आणि पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथून येत असलेली दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघातात पुनगाव येथील अर्जुन जाधव (वय २१) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले अर्जुन सुरवाडे, तुषार संतोष जामदार (रा. पुनगाव) जखमी झाले. तिघे शिरसाळे येथील प्रसिद्ध मारुती मंदिरात दर्शनासाठी जात होते.

हेही वाचा – पुण्याप्रमाणे मुंबईतही कोयता आणि चाकू घेऊन गुंडागर्दी

हेही वाचा – अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची सुटका, ४८ तासांत आरोपीला पकडण्यात जुहू पोलिसांना यश

अपघातानंतर मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. त्यात मोटारीतील वंदना दांभोरे, प्राजक्ता आसुदे, गीतांजली बांगर (रा. छत्रपती संभाजीनगर) जखमी झाले. सर्व जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.