Dhule Nijampur Crime News: धुळे जिल्ह्यातील निजामपूर जैताने येथे एक तरूण शुक्रवारी (दि. २० सप्टेंबर) दुपारी त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला होता. मात्र याची कुणकुण प्रेयसीच्या कुटुंबाला लागली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी सदर मुलाची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही बातमी मुलाच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्याचे कुटुंबिय आणि नातेवाईकांना पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन केले. ज्यामुळे निजामपूर येथे तणाव पाहायला मिळाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत हे निषेध आंदोलन मागे घेण्यास पीडित तरुणाच्या कुटुंबियांचे मन वळविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे वाचा >> श्रद्धा वालकर हत्याकाडांची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे २० तुकडे, कुठे घडली घटना?

तरुणाचा खून झाल्यानंतर निजामपूर पोलिसांनी चार संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार अजय राजेंद्र भवरे हा २० वर्षीय तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. दोघेही गप्पा मारत असताना मुलीचे नातेवाईक तिथे आले आणि त्याची चौकशी केली. त्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी त्यास शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडीने डोक्यावर मारहाण झाल्यामुळे अजय भवरे बेशुद्ध झाला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलवून सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी (साक्री) संजय बांबळे यांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, अजय भवरे याच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अजय भवरेच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता. यासंदर्भात पोलिसांनी अजय भवरे यांच्या कुटुंबियांची समजूत काढून आपण चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली. तसेच जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले.

Live Updates